कारे भुललासी वरलिया रंगा …
-रश्मी घटवाई
"आप ने बुलाया इसलिये!"
जणू काही हे गाणे सध्या आम आदमी पार्टी अर्थात "आप"चे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजडीवाल आणि दिल्लीची जनता यांच्यात सुरू आहे.गेले काही दिवस दिल्लीत जो काही फार्स सुरू आहे, त्यामुळे दिल्लीची त्रस्त झालेली जनता चिडून सध्या त्यांच्याबद्दल एकच उद्गार काढते आहे-"नौटंकी xx !" 'कारे भुललासी वरलिया रंगा'…असा दिल्लीकर स्वत:लाच दोष देतो आहे, की कुठून दुर्बुद्धी झाली आणि त्यांच्या शब्दांना भुललो आणि "आप"ला निवडून दिलं !सोशल मीडियावर ह्या नौटंकीचा खरपूस समाचार घेतला जातोय,की "आप तो ऐसे नं थे! "निवडणुकीपूर्वी मोठी मोठी आश्वासने देणारे अरविंद केजडीवाल सत्तेत येताच बदलले,ती सगळी आश्वासने विसरले,असंच बहु तेकांचं म्हणणं आहे.मुख्यमंत्री असूनही सवंगपणे रस्त्यावर धरणे देऊन मुख्यमंत्रीपदाची म्हणून काही इभ्रत असते,तिलाच त्यांनी पायदळी तुडवलं, इतरांसाठी वेगळे नियम आणि स्वत:साठी वेगळे नियम अशी त्यांची कार्यपद्धती आहे. मुळात त्यांना सत्तेवर यायचं नव्हतंच,फक्त आम्ही सत्तेत असतो तर यंव केलं असतं नी त्यंव केलं असतं अशी हाकाटी पिटायची होती. तसंच जर पदभार स्वीकारला नसता तर पगार,त्याबरोबर येणाऱ्या गोष्टी आणि सत्तेची नोंद हे सगळे काही त्यांच्या पदरी पडले नसते, म्हणून त्यांनी सत्ता स्वीकारली.आता सत्तासुंदरीची माळ गळ्यात पडल्यावर त्यातले काटे टोचू लागले आहेत,गव्हर्नन्स येत नाहीये,त्यामुळे आपलं सरकार कधी एकदा कोसळतं याच दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालले आहेत की काय,अशीच शंका लोकांना येऊ लागली आहे.मुळात त्यांच्या पक्षात हुकुमशाही आहे असे म्हणणारे आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करणं,त्यावर त्यांची आम आदमी पार्टीतून हकालपट्टी केली जाणं ,त्यांनी जंतर-मंतर वर आरंभलेलं उपोषण तीन-चार तासांतच गुंडाळणं ह्या सगळ्या रिअॅलिटी शो मध्ये परीक्षकांनी तणतणत निघून जाणं,रडारडी करणं ह्यासारख्यास्क्रिप्टमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत जेणेकरून केजडीवाल यांनागव्हर्नन्स येत नसल्याची बाब सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येणार नाही.त्याचे लक्ष गव्हर्नन्स ऐवजी या गदारोळावर केंद्रित होईल, ह्या हेतूने ही सगळी नौटंकी,ही हडेलहप्पी सुरू आहे,हे आता ज्या आम आदमीसाठी केजडीवाल मैदानात उतरले,त्या आम आदमीला पुरते कळून चुकले आहे.आपण फसलो असा उद्वेग तो व्यक्त करतो आहे.
ह्या नाटकाची दखल घेऊन दस्तुरखुद्द आपल्या देशाच्या राष्ट्रपतींनी- श्री प्रणव मुखर्जी ह्यांनी आपल्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला भारतवासियांना संबोधून केलेल्या भाषणात नाव नं घेता अरविंद केजडीवाल यांना फटकारलं."Equally dangerous is the rise of hypocrisy in public life. Elections do not give any person the licence to flirt with illusions. Those who seek the trust of voters must promise only what is possible. Government is not a charity shop. Populist anarchy cannot be a substitute for governance. False promises lead to disillusionment, which gives birth to rage, and that rage has one legitimate target: those in power. "असं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले होते. अर्थात राष्ट्रपतींनी काँग्रेसवरही एक प्रकारे शर-संधान केलं ."Corruption is a cancer that erodes democracy, and weakens the foundations of our state. If Indians are enraged, it is because they are witnessing corruption and waste of national resources. If governments do not remove these flaws, voters will remove governments. " भ्रष्टाचाराचा कर्करोग लोकशाहीला पोखरतो आणि राष्ट्र कमकुवत करतो अशी खंत व्यक्त करीत त्यांनी म्हटलं की भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय संपत्तीची नासाडी होताना बघून भारतीय जनता क्षुब्ध झालीय. जर सरकारनं हे दोष दूर केले नाहीत तर मतदाता सरकारलाच दूर करेल. त्यांचा रोख यूपीए सरकारच्या कार्यकालातल्या घोटाळ्यांकडे होता . 2G स्पेक्ट्रम घोटाळा,आदर्श हाऊसिंग घोटाळा,कोळसा घोटाळा , कॉमनवेल्थ गेम्सघोटाळा ,एक ना दोन,नित्य नव्या घोटाळ्यांनी केंद्रातलं यूपीए सरकार सर्वात भ्रष्ट सरकार होतं ,हे सिद्ध केलंच होतं.भ्रष्टाचार दूर केला नाही तर मतदाता सरकारलाच दूर करेल.असं फटकारून राष्ट्रपतींनीपण त्याबाबत सूतोवाच केलं.त्यांनी देशात स्थिर सरकार आणण्याबाबतआग्रही प्रतिपादन केलं.योगायोगानं वेगवेगळ्या एजन्सिजनी केलेली निवडणूकपूर्व पाहणी -प्रीपोल सर्व्हे-नुकतेच आलेत आणि ते एकमताने सांगताहेत की देशात भाजपाची लहर आहे आणि नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी सर्वात लायक व्यक्ती म्हणून लोकांची सर्वाधिक पसंती त्यांच्या नावाला आहे ."This chance will not come if India does not get a stable government. This year, we will witness the 16th General Election to our Lok Sabha. A fractured government, hostage to whimsical opportunists, is always an unhappy eventuality. In 2014, it could be catastrophic. Each one of us is a voter; each one of us has a deep responsibility; we cannot let India down. It is time for introspection and action."असं जेव्हा राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले तेव्हा whimsical opportunists ह्या त्यांच्या शब्दांचा रोख केजडीवाल ह्यांच्याबाबत आणि A fractured government ह्या शब्दांसह दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे त्यांचा अंगुलीनिर्देश होता. पूर्वी जरी ते कट्टर काँग्रेस पक्षाचे असले तरी माननीय राष्ट्रपतींनी आपल्या ह्या भूमिकेतून पक्षाच्या पलीकडे जाऊन 'वरलिया रंगा 'ला नं भुलता स्थिर सरकार आणण्याचं आवाहन करून देशाच्या हिताचीच काळजी केली. "Give the young jobs and they will raise the villages and cities to 21st century standards." ह्या त्यांच्या शब्दांमध्ये बहुधा मोदी जे तरुणाईला नोकरी आणि चांगल्या राहणीमानाचं आश्वासन देताहेत तेच प्रतिबिंबित होताना दिसतं आहे. एकूणातच ,"मोदी आनेवाला है … मोदी आनेवाला है…",असं त्यांनाही तर सुचवायचं नाही नं ?

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home