और कारवां बनता गया …
-रश्मी घटवाई
"मर्कटस्य सुरापानम् तत्र वृश्चिकदंशनम् |तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यति || " म्हणजे,
आधीच मर्कट तशातच मद्य प्याला झाला तशातही वृश्चिकदंश त्याला |झाली तयास तद् नंतर भूतबाधा चेष्टा वदू मग किती कपिच्या अगाधा ||
सध्या तशीच अवस्था काँग्रेस पक्षाची झालेली दिसते आहे.ह्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपल्याला अजिबात यश मिळणार नाही, हे काँग्रेस पक्षाच्या लक्षात आलेलं आहे.किंबहुना दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच हे सत्य खरे तर समोर आलेलं होतं ,पण सत्तेला आणि भ्रष्टाचाराला चटावलेल्याकाँग्रेस पक्षाला ते स्वीकारणं जड गेलं,एवढंच!जनता भ्रष्टाचाराला उबगली आहे,सत्तापरिवर्तन घडवून आणू इच्छिते आहे,हे सुद्धा मध्यप्रदेश,राजस्थान,छत् तीसगढ ह्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानं अधोरेखित केलं.त्यामुळेच की काय,सत्तेपासून दूर होण्याच्या कल्पनेनीसुद्धा कासावीस झालेला काँग्रेस पक्ष येनकेन प्रकारेण बातमीत रहाण्यासाठी आणि मतदाराचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी,भाजपाचे नेते,विशेषकरून भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी,तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,सरसंघचालक यांच्यावर टीका आणि बेताल वक्तव्ये करीत सुटला आहे.स्वत: केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असताना खरे तर खूप काही करायची संधी मिळूनही काँग्रेस पक्षानं केलं काय,तर लाखो-करोडो रुपयांचा भ्रष्टाचार !आणि एवढे करूनही पुन्हा जनतेचेच करोडो रुपये खर्चून, आपण यंव केलं आणि त्यंव केलं म्हणून काँग्रेस पक्ष जाहिरातींतून बढाया मारतो आहे, म्हणून समाजात आणि सोशल नेटवर्किंग साईटसवर तीव्र प्रतिक्रिया उमटते आहे-"भलेही यें सडकें और उसमें पडे गड्ढे हमने ही बनाये हों ,गिरे तो उसमें आप सब मिलकर ही...,भलेही हमने करोडोंके के घोटाले किये हों ,महंगाई की मार पडी तो आप सब पर ही …".
मुळात आता निवडणुकांचा प्रचार मुख्यत्वे होतो आहे,तो इंटरनेटच्या माध्यमातून.खरे तर आताशा मोबाईल फोन, इंटरनेट हीच साधने सर्वात प्रभावी आहेत आणि व्यक्तिश: संपर्क साधण्यासाठी आणि प्रत्यक्ष भेटण्यासाठी कुणाजवळ वेळ नाही आणि खरे तर फारसे प्रयोजन पण उरले नाही. त्यापेक्षा मोबाईल फोन, इंटरनेट ह्यांच्यायोगे एका वेळी अनेकांशी संपर्क साधला जाऊ शकतो,व्हिडीयो conference च्या माध्यमातून थेट भेट घेतल्यागत एका वेळी अनेकांशी भेटता -बोलता येतं .याचाच प्रत्यय लोकांनी आता "चाय पे चर्चा " या कार्यक्रमातून घेतला.मणिशंकर अय्यर ह्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यानं अतिशय असभ्य शब्दांत आणि असभ्य पद्धतीनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्या प्रच्छन्न टीकेला अक्षरश: सणसणीत चपराक देत नरेंद्र मोदी यांनी सबंध देशभरात ३०० शहरांत १००० केंद्रांवरून लोकांना चहासाठी आमंत्रित करून आणि त्यांच्याशी व्हिडीयो conference च्या अशा अभिनव पद्धतीनी संवाद साधत आपल्या आगळ्या-वेगळ्या नेतृत्वाची एक छोटीशी झलक दाखवून दिली. "जहरकी खेती" करतात,म्हणून सोनिया गांधींनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा मेरठ मध्ये खरपूस समाचार घेत त्यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं . गम्मतच आहे,काँग्रेस पक्षाच्या कुणीही मोदींवर टीका केली,की ती त्यांच्या अंगलट येते आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ मोदींना घडतो आहे.
"चाय पे चर्चा " ह्या कार्यक्रमाला नोएडामधल्या सेक्टर ५५ मध्ये मी पण गेले होते. सबंध भारतभर ह्या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.नोएडामधल्या सेक्टर ५५ मध्ये सुद्धा चांगली गर्दी झाली होती. तिथल्या अनेक लोकांशी मी संवाद साधला,तेव्हा उत्स्फूर्तपणे लोकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मला सांगितल्या आणि लेखाच्या माध्यमातून त्या संबंधितांपर्यं त पोहोचवण्याची गळ घातली.अनेक व्यक्ती तळागाळातल्या होत्या आणि नरेंद्र मोदी यांनीच देशाचे पंतप्रधान व्हावं म्हणून आपला पाठींबा देण्यासाठी ते तिथे धडपडत,आपापली कामे टाकून आलेले होते.
दिनेश कुमार हा युवक मोचीकाम करतो."गरीबांच्या तोंडातला घास काढून घेण्याव्यतिरिक्त काँग्रेस सरकारनं केलंच काय?गरीबों को यें क्या खाना खिलायेंगे,गरीब का खाना छिन रही है यह सरकार!" तो म्हणतो. दयावीरसिंह हा युवक टेलरिंगचा व्यवसाय करतो आणि त्याच्या मते तो आजवर इमानदारीनं वागत आला आहे,कधी कुणाकडून त्यानं अवाजवी पैसे घेतले नाहीत आणि तो 'रिश्वत -लाच 'देत नाही. वाहतूक पोलिसानं त्याला नुकतंच अडवलं आणि मोटरसायकलीचे कागदपत्र दाखवायला सांगितलं . त्याच्याजवळ इतर सर्व गोष्टी होत्या पण आर सी बुक नव्हतं,त्याबद्दल पोलिसानी त्याला पैसे मागितले. त्यावर त्यानं पोलिसाला म्हटलं की मला चालान कर!पोलिसाजवळ चालान बुक नव्हतं. "जब उसके पास चालान बुक नहीं थी,तो वह कैसे मुझे रोक सकता है ?मी चौकीत साडेतीन तास बसलो,पण मी लाच नाही ती नाहीच दिली, " दयावीरसिंह सांगतो.गाझियाबादमध्ये तो राहतो." किती भयानक परिस्थितीत,दलदलीच्या ठिकाणी आम्ही राहतो,ते तुम्ही एकदा बघायला या .घरोघरी डेंग्यू , मलेरियाचे रुग्ण आहेत.तिथल्या आमदार-खासदाराला तिथला विकास करायचाच नाहीये.काँग्रेस सरकारला आम्हां गरीबांच्या व्यथा काय ठाऊक?काँग्रेस पक्ष नुसतेच गरीबी हटाओ म्हणून नारे देतो. वो क्या गरीबी हटाएंगे !नाम गरीबी हटानेका दे रहे हैं ;पर गरीबोंकोही हटा रहे हैं ।"तो उद्वेगाने म्हणतो. जवळ जवळ सगळ्यांनी पोलिसांच्या दादागिरीवर आणि पैसे खाण्यावर टीका केली .त्या सगळ्यांचे रस्त्यावर वस्तू विकण्याचे, हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकण्याचे छोटे-छोटे व्यवसाय आहेत ."आम्ही गरिबांनी कुठे जावं ?आम्हाला सन्मानाने जगू द्या !अगली सरकार से हमें बस एक ही अपेक्षा है कि हम गरीबोंको जीने दें । हम पटरी पर काम करते हैं । रोज कमेटी आती है और सामान उठा के ले जाती है । उसमें हमारा नुकसान होता है। पोलिसांना दर महिन्याला आम्हाला पैसे द्यावे लागतात.१००-२०० रुपये अशी ती रक्कम दर महिन्याची बांधलेली आहे.कहर म्हणजे नवे नवे पोलिस येतात,आणि आम्हाला पैसे द्यावे लागतात.हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकण्याचे काम करणार्यांना तर दर महिन्याला ५००-१००० रुपये द्यावे लागतात.पण आम्ही अगतिक आहोत . पुढच्या सरकारनं गोरगरीबांना माणूस म्हणून सन्मानानं जगू द्यावं ,एवढंच आमचं मागणं आहे!"ते एकसुरात सांगतात
आजचा सुशिक्षित आणि टेक्नोसॅव्ही तरुण, नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर आणि गुजरातमध्ये झालेल्या विकासावर बेहद्द खूष आहे.किंबहुना सोशल नेट्वर्किंग साईटसवर ह्यावर भरपूर चर्चा घडते आहे आणि देशातही अशाच प्रकारचा विकास घडण्याची ही पिढी वाट बघते आहे. प्रत्यक्ष गाठी-भेटीतहीटेक्नोसॅव्ही तरुण पिढी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल भरभरून बोलते आहे.विकास अग्रवाल हा नोएडामधला युवक कम्प्युटर इंजिनीअर आहे. जे.पी.इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी मधून त्यानं इंजिनीअरिंग केलं आणि आता तो एका विख्यात कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. त्याच्याशी प्रत्यक्ष भेटीत संवाद साधला.आजच्या तरुणाईची विचारधाराच त्याच्या बोलण्यातून व्यक्त होऊ लागली.
"शेती,उद्योग,निर्यात अशा सगळ्या आघाड्यांवर युपीए सरकार सपशेल अपयशी ठरलंय.गेल्या नऊ वर्षाच्या कुशासनातून त्यांनी देशाला काय दिलं,तर केवळ भ्रष्टाचार !आपली GDP ८ टक्क्यांवरून ४. ३ टक्क्यांवर आली युपीएच्या कार्यकाळात.IIP-इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रॉडक्शनचे आकडेही नकारात्मक आहेत.भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या मॅन्यूफॅक्चरिंगची पण तीच गत आहे,ते क्षेत्र उतरणीला लागलं आहे आणि मॅन्यूफॅक्चरिंगची आकडेवारी निगेटिव्ह आहे.निर्यात होत नाहीये, उद्योग बंद पडताहेत,कारण सरकारजवळ उद्योग-व्यवसायासाठी काहीच योजना (policies) नाहीयेत. वित्तीय तूट वाढतेय.अन्न -धान्य साठवणूकीसाठी व्यवस्था नसल्याने अन्नधान्य गोदामांअभावी वाया जातंय आणि गोरगरीबांना खायला नाहीये.-धान्य साठवणूकीसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने ते निर्यात नं होता उलट वाया जातं आणि देशातल्या धान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी धान्य बाहेरून आणावं लागतं आणि वित्तीय तुटीत आणखी भर पडते.शिवाय महागाई रोखण्यात हे सरकार अगदी अपयशी ठरलं . दिवसेंदिवस महागाई वाढतेय,पण त्या प्रमाणात लोकांचे पगार वाढत नाहीयेत. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य अगदी त्रस्त झालेला आहे. उद्योग, मॅन्यूफॅक्चरिंग कमी झाल्यामुळे रोजगारनिर्मिती पण नाहीये.काँग्रेस म्हणते की आमची सर्वात मोठी अचीव्हमेंट म्हणजे १९९२ मध्ये आम्ही अर्थव्यवस्था सावरली आणि रोजगारनिर्मिती केली.पण ही शॉर्ट टर्म व्यवस्था झाली, long term व्यवस्थेचं काय?" विकास अग्रवाल पोटतिडकीनं विचारतो.त्याच्यामते नरेंद्र मोदी ह्यावर अगदी चांगला मार्ग काढतील,उद्योग,परदेशांशी व्यापार,आपली निर्यात वाढवतील आणि देशातल्या युवकांसाठी रोजगार पण निर्माण करतील.त्यासाठी चांगले रस्ते,वीज ह्यासारख्या पोषक सुविधा सुद्धा उपलब्ध करतील त्यांनी हे सारे गुजरात मध्ये करून दाखवले आहे.
देशभर नुसती नरेंद्र मोदी ह्यांची लहर आहे,हा लेख लिहितेवेळी voters'survey चे हाती आलेले निष्कर्ष पण हेच सांगताहेत ." मैं अकेला ही चला था जानिब-ए मंझिल मगर,लोग आते गए और कारवां बनता गया … "हे त्यांच्या बाबतीत अगदी खरं ठरतंय!

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home