हर हर महादेव
-रश्मी घटवाई
सध्या वाराणसी मध्ये केवळ आणि केवळ निवडणुकांचं वारं वाहतंय. १६ व्या लोकसभा निवडणुकीच्या नऊ टप्प्यांपैकी वाराणसीमध्ये शे वटच्या टप्प्यात म्हणजे १२ मे रोजी मतदान व्हायचे आहे.वाराणसीमध्ये भाजपाचा उमेदवार कोण असणार ह्यावर सर्वच प्रसार माध्यमांमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. "डॉ. मुरली मनोहर जोशी विरुद्ध नरेंद्र मोदी "यांवर चर्चा वितंडवाद झडताहेत आणि प्रसार माध्यमांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया ऐकायला येताहेत. वाराणसीतल्या माझ्या चार-पाच दिवसांच्या माझ्या मुक्कामात अनेकांशी मी विस्तृत संवाद साधला होता.वाराणसीतल्या रामनगर किल्ल्यानजिक एका टी-स्टॉलवर ८ मार्च रोजी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांच्या 'चाय पे चर्चा " चं आयोजन केलं गेलं होतं .तिथे अतिशय उत्साही तरुणांचा समूह कार्यरत होता .रामनगरचा किल्ला बघून मी बाहेर पडले तर तिथे हे दृश्य दिसलं .मी त्या सर्वांशी संवाद आरंभला. त्या सगळ्यांच्या मते भारतभर मोदी लहर आहे. वाराणसीमध्ये भगवा झेंडा फडकेल,'हर हर महादेव 'ललकारी गुंजेल म्हणजेच भाजपा जिंकेल असं त्या सर्वांचं म्हणणं आहे.
वाराणसीतले डॉ अनुपम गुप्ता ह्यांनी कायद्यात डॉक्टरेट मिळवली असून ते आकाशवाणीच्या वाराणसी केंद्रात निवेदक आहेत."डॉ. मुरली मनोहर जोशी विरुद्ध नरेंद्र मोदी हे हेतुत: पसरवलं जातंय.जाणून बुजून मिडीयामध्ये अशा बातम्या पसरवल्या जाताहेत की डॉ. मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी ह्यांच्यामध्ये वाराणसीमधून निवडणूक लढवण्यावरून नाराजी आहे किंवा त्यांच्यात तेढ निर्माण झालीये आणि उभयतांच्या समर्थकांमध्ये हाणामाऱ्या होताहेत वगैरे. तसं काहीही नाहीये.सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या दृष्टीसमोर कमळ आहे.वाराणसीतून भाजपाचा उमेदवार जिंकावा यासाठी तो झटतो आहे.भाजपाची सीट टिकवून ठेवणे हे कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट्य आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी भाजपाचे उमेदवार घोषित झाले तरीही तो कार्य करणार आणि नरेंद्र मोदी वाराणसीतले भाजपाचे उमेदवार म्हणून उभे रहाणार असले तरीही तो कार्य करणार आहे. मिडीयाच्या ह्या असल्या अपप्रचारामुळे फार फार तर काही किरकोळ मतदारांच्या मनात संभ्रम उत्पन्न होईल;मात्र सगळ्यांना ह्या असल्या बातम्यांमागचं सत्य ठावूक आहे. भाजपानं -डॉ .मुरली मनोहर जोशी ह्यांनी मागच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या सिटिंग एमपीला हरवून वाराणसीमधून विजय मिळवला होता." डॉ अनुपम गुप्ता सांगतात .नरेंद्र मोदी वाराणसीतले भाजपाचे उमेदवा र म्हणून उभे रहाणार असले तर बसपाचे मुख्तार अन्सारी त्यांच्या विरोधात उभे राहणार म्हणून सांगताहेत,त्याबद्दल मी त्यांना विचारलं.कारण आमदार मुख्तार अन्सारी गेल्या सातेक वर्षांपासून पोलिस कस्टडीत तुरुंगात असून त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यावर डॉ अनुपम गुप्ता विस्तृतपणे भाष्य करतात की अद्याप मुख्तार अन्सारीच्या बाबतीत सजा सुनावली गेली नाहीये ,त्यामुळे ती व्यक्ती निवडणूक लढवू शकेल.सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै दिलेल्या निर्णयाबद्दल तसंच संसदेनं घेतलेल्या ह्यासंदर्भातल्या पवित्र्याबद्दल, लालू तुरुंगातून बाहेर आल्याबद्दल सर्वसाधारण भारतीय अजूनही बुचकळ्यात पडला आहे,एवढं नक्की!मात्र "मतांचं ध्रुवीकरण होईल आणि हिंदू मते भाजपाच्या उमेदवाराच्याच पारड्यात पडतील,"असा ठाम विश्वास डॉ अनुपम गुप्ता यांना वाटतो .
"यहां हर हर महादेव नारा गूंजेगा " भाजयुमोचे वाराणसीचे जिल्हाध् यक्ष संतोष द्विवेदी सांगतात . त्यांच्यामते मोदी की जोशी हा वाद मिडियानं मुद्दाम निर्माण केलाय."डॉ .मुरली मनोहर जोशी और नरेंद्र मोदी इनमें कोई मनमुटावभी नहीं है। वाराणसीच्या सीटवरून दोघांमध्ये काही कलह नाही, भाजपा मध्येही काही अंतर्गत रणकंदन होत नाहीये ;पण मीडियात मात्र असल्या बातम्या येताहेत" संतोष द्विवेदी सांगतात .त्यांना मी विचारलं , नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अरविंद केजडीवाल निवडणूक लढवणार आहेत.जर का भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वाराणसीमधूननिवडणूक लढवणार असतील तर काय चित्र दिसेल,ह्यावर त्यांच्या मते इथे वाराणसीमध्ये आम आदमी पार्टीला कोणी ओळखतही नाही की पुसतही नाही! "अरविंद केजडीवाल ह्यांना तर वाराणसी चिमूटभर पण धूप घालणार नाही!वाराणसी म्हणजे काही दिल्ली नव्हे किंवा गाझियाबाद नव्हे की इथे केजडीवाल ह्यांना मतं पडतील.यह पूर्वांचल है। उनको या 'आप 'को यहां तिनकेभरभी नहीं पहचानता कोई!" द्विवेदी सांगतात .
"कितनी अजीब बात है की पिछले १० सालो से काँग्रेस इस देश को चला रही है और कई हजार करोड़ के घोटाले हुए |लेकिन केजरीवाल नरेंद्र मोदी के खिलाफ मोर्चा खोले है । "रामनगर किल्ल्यानजिकच्या त्याटी-स्टॉलवर भेटलेला अर्जुन सिंह हा उत्साही युवक सांगतो. "आपल्या भारत देशाला एकेकाळी सोने की चिडिया म्हटलं जायचं .मात्र आधी ब्रिटिशांनी भारताला लुटलं आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं. मला इथे गांधीजींच्या त्या वक्तव्याची आठवण होते,त्यांनी म्हटलं होतं की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस पक्षाचं काही प्रयोजन नाही ,ती बरखास्त केली गेली जायला हवी .यूपीए सरकारनं अनेक घोटाळे केलेत. कोळसा घोटाळा,टेलिकॉम घोटाळा …घोटाळ्यांची ही यादी नं संपणारी आहे. राहुल गांधी काहीबाही दावे करताहेत की आम्ही अमुक केलं न तमुक केलं !माझ्यामते घोटाळे करणाऱ्या काँग्रेसला राजकारणाच्या पटावरून गायब करण्याची हीच वेळ आहे. "अर्जुन सिंह सांगतो.
त्या सगळ्या उत्साही तरुणांना मी विचारलं ,की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अरविंद केजडीवाल निवडणूक लढवणार आहेत, तेव्हा काय होईल,त्यावर ती सगळी तरुण मुले एकमुखानी म्हणाली,की "हम तो चाहते हैं, कि नरेंद्र मोदी वाराणसी से चुनाव लडें,और वाराणसी में उनके विरुद्ध अरविंद केजडीवाल चुनाव लडें!केजडीवाल कहते रहते हैं,हमारी औकातही क्या है !वाराणसी में उन्हें उनकी औकातही क्या है,इसका पता चल जायेगा! आम्हाला तर हवंय की केजडीवाल ह्यांनीवाराणसीमध्ये नरेंद्र मोदी ह्यांच्या विरोधात निवडणूक लढवावी म्हणजे त्यांना कळेलच,की आपली किती पत आहे ते!" एकुणातच हंसो हंस:;बको बक: हे सिद्ध करायला ही तरुणाई उत्सुक आहे .
दशाश्वमेध घाट
वाराणसीतल्या रामनगर किल्ल्यानजिक एका टी-स्टॉलवर ८ मार्च रोजी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांच्या 'चाय पे चर्चा " चं आयोजन करणारे उत्साही युवक
------------------------------ ------------------------------ ---------

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home