Saturday, May 17, 2014

अच्छे दिन आ गये हैं!

"अच्छे दिन आनेवाले हैं " 
-रश्मी घटवाई 

चांगले शासनकर्ते निवडून देण्याचा अधिकार सर्वसामान्यांना असणे ही एक फार मोठी सशक्त व्यवस्था
असते.परंतु चांगले शासनकर्ते निवडून देण्यासाठी डोळसपणे मतदान करणारे मतदार आणि चांगले शासनकर्ते होण्याच्या योग्यतेचे उमेदवार ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.गेल्या दहा वर्षांत देशावर राज्य करताना ज्यांनी चांगले शासनकर्ते होण्याची आणि जनमानसात आपली उत्तम आणि उत्तुंग प्रतिमा निर्माण करण्याची चांगली चालून आलेली संधी हातची गमावली आणि साडे पाच हजार लाख करोड रुपयांचे घोटाळे करणारे भ्रष्ट सरकार असा नावलौकिक मिळवून विश्वासार्हता कायमची गमावली त्या काँग्रेस प्रणीत युपिए सरकारनं देशाला विकासाच्या बाबतीत दहावीस वर्षे मागे नेउन ठेवलं .       

"देश सपशेल अपयशी ठरण्यामागे कारणीभूत असते तिथली शोषणकर्ती व्यवस्था,कारण शासन-यंत्रणा, अनिर्बंध सत्ता आणि संपत्ती,शोषक राज्यकर्त्यांच्या हाती एकवटलेली असते. "Countries become failed states not because of their geography or their culture,but because the legacy of extractive institutions,which concentrate power and wealth in the hands of those controlling the state,opening the way for  unrest ,strife and civil war. " असं  
"Why Nations Fail .The Origins of Power,Prosperity and Poverty" ह्या पुस्तकात Daron Acemoglu आणि James A. Robinson ह्या लेखकद्वयीनं जागोजागी अधोरेखित करून लिहिलंय,ते आपल्या बाबतीत शब्दन शब्द खरे ठरले आहे. "चांगले शासनकर्ते निवडून देण्याचा अधिकार सर्वसामान्यांना असणे ही एक फार मोठी सशक्त व्यवस्था भारताच्या घटनेने भारतीय नागरिकांना दिलेली असल्यामुळे निदान जागरूक नागरिकांनी तरी आपला देश गरिबीच्या खाईत लोटला जाणार नाही,तो प्रगतीपथावर राहील ह्याची काळजी घ्यायला हवी."अशा अर्थाचं विवेचनही त्यात त्यांनी केलं आहे. 

ह्या शोषक राज्यकर्त्यांच्या विरोधात घटनादत्त अधिकार वापरून आपल्या देशातल्या सुजाण नागरिकांनी लोकशाहीच्या मार्गानं निषेध नोंदवला आणि मतदान यंत्रांतून सत्ताबदल घडवून आणण्याचा निश्चय केला.नऊ टप्प्यांत ७ एप्रिल ते १२ मे अशा ३५ दिवस सुरू असलेल्या ह्या प्रदीर्घ निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनतेनं ६६.३८ टक्के मतदान केलं. लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात ह्या वेळची मतदानाची टक्केवारी ही आजवरची सर्वाधिक ठरली.इंदिरा गांधी ह्यांच्या हत्येनंतर काँग्रेस ची लाट होती,त्यावेळी ६४.०१ टक्के मतदान झालं होतं. मागच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी मतदानाची टक्केवारी  ५८. १९ अशी होती.वस्तुत: ह्यावेळच्या टक्केवारीत आणखी वाढ झाली असती , परंतु लाखो मतदारांची नावं मतदार याद्यांमधून ऐनवेळी गहाळ झाल्यानं अनेक जणांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित रहावं लागलं. निवडणूक आयोगाची नाचक्की झाली,ती वेगळी !वस्तुत: अनेक मतदार कारणपरत्वे इतरत्र जावे लागल्याने मतदान करू शकत नाहीत.त्यामुळे ई -व्होटिंग करता येणे ही आता काळाची गरज झाली आहे. पैशांचे व्यवहार जर आपण इंटरनेटच्या माध्यमातून सहजपणे,निर्धोकपणे करतो,तर ई -व्होटिंग पण इंटरनेटच्या माध्यमातून निर्धोकपणे करता येणे सहज शक्य आहे.शिवाय निवडणुकीच्या वेळी उधार-उसनवार करून इकडून तिकडून कर्मचारी गोळा करून त्यांची इलेक्शन ड्युटी लावण्याऐवजी निवडणूक आयोगानं पूर्णवेळ ,कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करायला हवेत.म्हणजे नामुष्कीची वेळ येणार नाही.शेवटच्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी तर आधीच्या आठ टप्प्यांपेक्षा अधिक मतदान झाले. त्याहून महत्वाचं म्हणजे ह्या शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचं लक्ष ज्या जागेकडे लागून राहिलेलं होतं,त्या वाराणसीमध्ये मतदान होतं,पंतप्रधान पदाचे भाजपाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विरोधातले इतर उमेदवार,त्यांच्या नथींआडून तीर मारणारे बाकीचे, ह्या सगळ्या संग्रामाची साद्यंत हकीकत सांगण्यास सज्ज झालेली प्रसारमाध्यमं , त्यामुळे वाराणसीला अपार महत्व आलेलं होतं. 

१६ मे रोजी घोषित होणार असणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष लागून राहिलेलं असताना निवडणूकोत्तर अंदाज चाचण्या -Exit Polls चे निकाल फुटल्याच्या बातम्यांनी वेग पकडला. विविध यंत्रणांनी घेतलेल्या ह्या सगळ्या  Exit Polls नी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं आणि काँग्रेसला लोकांनी सपशेल उलथून टाकलेलं बघायला मिळणार असल्याचं चित्र दाखवलं आणि देशभर आनंदाची एकच लहर उसळली .                        

देशातल्या वातावरणाचं प्रतिबिंब साधारणत: शेअर बाजारात झळकतं.Exit Polls च्या फुटलेल्या नुसत्या बातमीनं "अच्छे दिन आनेवाले है" ही भाजपाची कॅचलाईन शेअर बाजारानं प्रत्यक्षात उतरवत येऊ घातलेले दिवस किती सुखद असतील,त्याची झलक दाखवली आणि दोन दिवसांत सेन्सेक्सनं जेव्हा १००० अंकांनी उसळी घेतली,निर्देशांकाला अभूतपूर्व पातळीवर नेउन ठेवलं,तेव्हाच सत्ताधारी आणि अन्य राजकीय पक्षांसह जनसामान्यांना ह्या निवडणुकीच्या निकालांची दिशा कळून चुकली. जणु शेअर बाजारानं 'बुल रन' ची नांदी दिली आणि 'Foreign Institutional Investor' -FII "चलो बु(ल)लावा आया है " म्हणत गुंतवणुकीसाठी भारतीय शेअर बाजाराकडे पळत सुटले. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी १६ मे रोजी हा लेख लिहितेवेळी,आदल्या दिवशी सेन्सेक्स २३९०५.६० अंकांवर बंद झाला होता तो २४२७१. ५४ अंकांवर सुरू झाला आणि अगदी थोड्याच वेळात त्यानं आजवरचा सर्वाधिक उच्चांक २५३७५. ६३ हा आकडा गाठला.एका दिवसात हजाराच्यावर उसळी मारत शेअर बाजारानं मोदी लहर दाखवून दिली.निफ्टी निर्देशांक  ७५६३.५० अशा आजवरच्या उच्चांकावर पोहोचला.

भय-भूक-भ्रष्टाचारमुक्त सुशासन नरेंद्र मोदी देतील ह्या खात्रीनं भारतीय जनतेनं त्यांना मत दिलं होतं, मग स्थानीय भाजपा उमेदवार कोणी का असेना!त्यामुळे भाजपाला निर्विवाद बहुमत मिळालं. नरेंद्र मोदी वडोदरा आणि वाराणसी अशा दोन्ही जागांवरून भरघोस मतांनी विजयी झाले .नरेंद्र मोदी कोणची जागा ठेवतील आणि कोणची जागा सोडतील हा बहुचर्चित मुद्दा आहे. एक मात्र नक्की की गुजरात मोदीभक्त असल्याने,भाजपाचा बालेकिल्ला असल्याने भाजपाच्या अन्य उमेदवारासाठी वडोदरामधून जिंकणे हे भाजपाच्या अन्य उमेदवारासाठी वाराणसीमधून जिंकण्यापेक्षा तुलनेनं सोपे आहे. नरेंद्र मोदी ह्यांना वाराणसीने भरभरून पाठींबा दिला आहे.वाराणसीतली तरुणाई आणि मुख्य म्हणजे मोठ्या संख्येनं मुस्लिम मतदारांनी नरेंद्र मोदी ह्यांना मते दिली आहेत. नरेंद्र मोदी आपली उपेक्षा आणि निराशा करणार नाहीत अशी वाराणसीतल्या लोकांची खात्री आहे. प्रत्यक्ष आणि सोशल मीडिया दोन्हीकडे वाराणसीतली तरुणाई प्रचारार्थ उतरली होती."यह बनारस है ,यहाँ की बात ही कुछ और है "नावानं आपला फेसबुक अकाउंट चालवणारी वाराणसीतली तरुणाई गालातल्या गालात हसत म्हणते- "गुरु गनीमत हौ कि ‪‎फेसबुक‬ अमेरिका में बनल हौ,नाहीं त ई ‪‎UPA सरकार‬ एकर नाम "राजीव गाँधी दोस्त बनाओ योजना" रख देहले होत!" त्यांच्याशी झालेल्या वार्तालापात वाराणसीतले युवक सांगतात ,
बनारस के रंग बड़े अज़ीब है!! जरा गौर फरमाईयेगा … ये वो नगरी है जहाँ आप एक मुस्लिम बच्चे को कृष्ण की फोटो दिखा कर अगर पुँछे की बेटा बाँसुरी कौन बजा रहा है तो जवाब आयेगा 'अल्लाह'! ये वो नगरी है जहाँ हर मुहल्ले मे एक पद्म विभुषणऔर पदमश्री वाला आपको मिल जायेगा. ये वो नगरी है जहाँ गंगा माँ की गोद मे मुस्लिम भी नहाता है और हिन्दु भीये वो नगरी है जहाँ हर ईद से पहले कोई हिन्दु रोज़े रख लेता है तो दिवाली मे कोई मुस्लिम पटाखे फोड़ता नज़र आता है!ये वो नगरी है जहाँ की फिजा मे शेरो-शायरी की महक भी है और मन्त्रों की गुँज भी !ये वो नगरी है जहाँ भाँग तो आपको मुफ्त मिल जायेगी पीने के लिए पर ठंण्डई के पैसे देने पड़ सकते है.ये वो नगरी है,जिसकी बनारसी साड़ी बनती किसी मुसलमान के हाथों से है पर कोई शर्मा या श्रीवास्तव के बेटी की शादी मे ईस्तेमाल होती है! ये वो नगरी है जहाँ के लोग पान भी बड़ा रस लगा कर खाते हैं और दुसरों को खिलाते हैं. ये वो नगरी है जहाँ के ठग और विद्वान दोनो विश्व प्रसिद्घ हैं!!यो वो नगरी है जिसमे जिन्दगी का रस कुट-कुट कर भरा हुआ है, बस आप पर निर्भर है कि आप को क्या निचोड़ना है ज़रा समझिये काशी-बनारस के मिज़ाज को!!इसमे नज़ाकत भी है और शरारत भी है!जो लोग समझतेहैं कि वो काशी की जनता को समझ गये है तो उन्हे ये जानना जरुरी है कि ये ठग के नाम से ऐसे ही मशहुर नही है पर अगर किसा पर दिल आ गया तो ईस चुनाव मे वोट उसे ही देगी!!काशी है ये बाबा विश्वनाथ की नगरी!! सम्भल कर रहना!"

वाराणसीतली तरुणाई कवितेतून मग या प्राचीन शहराचे महत्व विशद करते -
"कोई नहीं समझ पाया है, महिमा अपरम्पार बनारस।

भले क्षीर सागर हों विष्णु, शिव का तो दरबार बनारस।।

हर-हर महादेव कह करती, दुनिया जय-जयकार बनारस।

माता पार्वती संग बसता, पूरा शिव परिवार बनारस।।

कोतवाल भैरव करते हैं, दुष्टों का संहार बनारस।

माँ अन्नपूर्णा घर भरती हैं, जिनका है भण्डार बनारस।।

महिमा ऋषि देव सब गाते, मगर न पाते पार बनारस।

कण-कण शंकर घर-घर मंदिर, करते देव विहार बनारस।।

वरुणा और अस्सी के भीतर, है अनुपम विस्तार बनारस।

जिसकी गली-गली में बसता, है सारा संसार बनारस।।

एक बार जो आ बस जाता, कहता इसे हमार बनारस।

विविध धर्म और भाषा-भाषी, रहते ज्यों परिवार बनारस।।

वेद शास्त्र उपनिषद ग्रन्थ जो, विद्या के आगार बनारस।

यहाँ ज्ञान गंगा संस्कृति की, सतत् प्रवाहित धार बनारस।।

वेद पाठ मंत्रों के सस्वर, छूते मन के तार बनारस।

गुरु गोविन्द बुद्ध तीर्थंकर, सबके दिल का प्यार बनारस।।

कला-संस्कृति, काव्य-साधना, साहित्यिक संसार बनारस।

शहनाई गूँजती यहाँ से, तबला ढोल सितार बनारस।।

जादू है संगीत नृत्य में, जिसका है आधार बनारस।

भंगी यहाँ ज्ञान देता है, ज्ञानी जाता हार बनारस।।

ज्ञान और विज्ञान की चर्चा, निसदिन का व्यापार बनारस।

ज्ञानी गुनी और नेमी का, नित करता सत्कार बनारस।।

मरना यहाँ सुमंगल होता और मृत्यु श्रृंगार बनारस।

काशी वास के आगे सारी, दौलत है बेकार बनारस।।

एक लंगोटी पर देता है, रेशम को भी वार बनारस।

सुबहे-बनारस दर्शन करने, आता है संसार बनारस।।

रात्रि चाँदनी में गंगा जल, शोभा छवि का सार बनारस।

होती भव्य राम लीला है, रामनगर दरबार बनारस।।

सारनाथ ने दिया ज्ञान का, गौतम को उपहार बनारस।

भारत माता मंदिर बैठी, करती नेह-दुलार बनारस।।

नाग-नथैया और नक्कटैया, लक्खी मेले चार बनारस।

मालवीय की अमर कीर्ति पर, जग जाता, बलिहार बनारस।।

पाँच विश्वविद्यालय करते, शिक्षा का संचार बनारस।

गंगा पार से जाकर देखो, लगता धनुषाकार बनारस।।

राँड़-साँड़, सीढ़ी, संन्यासी, घाट हैं चन्द्राकार बनारस।

पंडा-गुन्डा और मुछमुन्डा, सबकी है भरमार बनारस।।

कहीं पुजैय्या कहीं बधावा, उत्सव सदाबहार बनारस।

गंगा जी में चढ़े धूम से, आर-पार का हार बनारस।।

फगुआ, तीज, दशहरा, होली, रोज़-रोज़ त्योहार बनारस।

कुश्ती, दंगल, बुढ़वा मंगल, लगै ठहाका यार बनारस।।

बोली ऐसी बनारसी है, बरबस टपके प्यार बनारस।

और पान मघई का अब तक, जोड़ नहीं संसार बनारस।।

भाँति-भाँति के इत्र गमकते, चौचक खुश्बूदार बनारस।

छनै जलेबी और कचौड़ी, गरमा-गरम आहार बनारस।।

छान के बूटी लगा लंगोटी, जाते हैं उस पार बनारस।

हर काशी वासी रखता है, ढेंगे पर संसार बनारस।।

सबही गुरु इहाँ है मालिक, ई राजा रंगदार बनारस।

चना-चबेना सबको देता, स्वयं यहाँ करतार बनारस।।

यहाँ बैठ कर मुक्ति बाँटता, जग का पालनहार बनारस।

धर्म, अर्थ और काम, मोक्ष का, इस वसुधा पर द्वार बनारस।।

मौज और मस्ती की धरती, सृष्टि का उपहार बनारस।

अनुपम सदा बहार बनारस, धरती का श्रृंगार बनारस।।"
बनारसवाल्यांचं हे मनोगत पुरेसं बोलकं आहे.ह्या तरुणाईला विश्वास आहे,की नरेंद मोदी वाराणसीचा चेहरामोहरा 
 असा काही सुंदर करतील,की आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन आणि धार्मिक महत्व ह्या बाबतीत प्रसिध्द असलेली काशी नगरी आणखी लोकप्रिय होईल.
 गुजरात मॉडेलच्या धर्तीवर 
वाराणसीचा विकास होईल,कायापालट होईल . 
गुजरात मॉडेलबद्दल सर्वत्र बोलले जात असल्यामुळे हे 
गुजरात मॉडेल नक्की आहे तरी काय,हे जाणून घेण्यासाठी मी आमच्या कौटुंबिक स्नेह्यांशी संपर्क साधला.
 कुलकर्णी कुटुंबीय गेली २४ वर्षं अहमदाबाद मध्ये राहताहेत.त्यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या विस्तृत संभाषणात त्यांनी गुजरातमधल्या विकासावर प्रकाश टाकला."आम्ही मूळचे पुण्याचे .पुण्यातसुद्धा पाच 
 मिनिटे का होईना,वीज जाते. मात्र अहमदाबाद मध्येच काय,गुजरातच्या गावांतही २४ तास वीज असते .गुजरातमध्ये सुशासन,उत्तम गव्हर्नन्स आहे. गुजरातमध्ये पर्यटनावर खूप भर दिला आहे आणि पर्यटनाच्या बाबतीत गुजरातला प्रोजेक्ट करण्याच्या कामी नरेंद्र मोदी ह्यांनी मोठी मोठी माणसं जोडलेली आहेत.विरोधी पक्षांनी २००२ च्या गुजरातच्या दंग्यांवरून मोदींच्या विरोधात रान उठवलं.मात्र त्यानंतर भारतात अन्यत्र दंगे झाले तरी गुजरातमध्ये दंगे झाले नाहीत.अशा वेळी मात्र ज्या राज्यांत दंगे झाले, त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हे विरोधी लोक बरे चूप बसतात. गुजरात मध्ये मोदींनी देशी-विदेशी गुंतवणूक आणली. मोदींच्या गुजरातमध्ये बिझनेस कम्युनिटीला पोषक वातावरण असल्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान बनताहेत म्हणून अवघी व्यावसायी मंडळी खूष आहेत.आता देशाचा आणि गुजरातचा विकास होईल असं सर्वांना वाटतंय."श्री. कुलकर्णी सांगतात. 

थोडक्यात,महागाई आणि भ्रष्टाचार ह्यांच्या चक्रात देशाला पिळून काढणाऱ्या दुष्ट बलाढ्य अशा राजकीय शक्तीला जनतेनं सत्तेवरून खाली खेचून काढलंय.याआधी बिगर काँग्रेस सरकारांनी जे केलं , अगदी जनता पक्षाच्या कारकीर्दीत झालं तसलं काही होऊ नये,ह्यासाठी मनोमन प्रार्थना करीत सगळा देश पुन्हा एकदा स्वत:ला आश्वस्त करतो आहे,की अच्छे दिन आनेवाले हैं!नव्हे; अच्छे दिन आ गये हैं! 

रश्मी घटवाई 
०९८७१२४९०४७    

अच्छे दिन आ गए हैं ...

अच्छे दिन आ गए हैं

Here is my article published in today's Tarun Bharat:

http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Asmpage&NB=2014-05-18#Asmpage_2


Ganga ki Saugandh

सर्वधर्मसमभाव  
रश्मी घटवाई 

उत्तर प्रदेशातल्या काही राजकारणी नेत्यांनी अल्पसंख्यकांचं तुष्टीकरण करण्याच्या नादात एवढ्यात अतिशय वादग्रस्त विधानं केलीत.मुलायम सिंह यांच्या मनात एकाएकी बलात्काराच्या अपराधात दोषी ठरलेल्या आरोपींबाबत कणव दाटून आली आणि मुरादाबाद इथल्या एका निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांनी त्या दोषी आरोपींना फाशीची सजा झाल्याबद्दल अश्रू ढाळले.त्यांची फाशीची सजा रद्द होऊन त्यांना सौम्य शिक्षा व्हावी या अर्थाचा पुरस्कार करताना 'मुलेच ती …मुलांकडून कधी कधी चुका घडणारच!'‘लड़कों से गलती हो जाया करती है।’असली तद्दन बलात्कारासारख्या गुन्ह्याची आणि गुन्हेगारांची पाठराखण करणारी विधानं केलीत .मुंबईतल्या शक्ती मिल्स गॅंगरेप प्रकरणातल्या विजय जाधव,कासिम बंगाली ,सलीम अन्सारी, सिराज रेहमान  ह्या गुन्हेगारांच्या नावांवर जरी कुणी नजर टाकली,तरी मुलायम सिंह यांना हा उमाळा येण्यामागचे कारण लक्षात येईल .ही क्षुद्र मानसिकता  कशासाठी,तर अल्पसंख्यकांच्या मतांसाठी !आपणच काय ते त्यांचे तारणहार ह्याच अविर्भावात ते सतत वावरत असतात.त्यांच्या उत्कर्षासाठी आणि गरीब बिचाऱ्या अल्पसंख्यकांच्यासाठी कार्य करणारे ह्या भूतलावर आपणच काय ते एकमेव नेते आहोत आणि म्हणून ह्या अल्पशिक्षित समाजानं आपल्याला आणि पक्षाला एकगठ्ठा मते देऊन निवडून आणावं,म्हणून प्रसंगी लाचार,अगतिक होऊन, तर कधी दंडेलशाही करून येनकेन प्रकारेण ते अल्पसंख्यक समुदायावर आपली पकड ठेवू पहातात. मौलाना मुलायम असंच त्यांना म्हटलं जातं.आझमखान हे उत्तर प्रदेशातले आणखी एक रत्न,ज्यानं भारत माता 'डायन' असल्याबद्दल म्हटलं होतं ,गाझियाबाद मध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेत, कारगिलच्या लढाईत विजय मिळवण्यासाठी लढायला गेलेले हिंदू सैनिक नसून मुस्लिम सैनिक होते.  'कारगिल की  पहाडियोंको फ़तेह करणे वाले हिंदू सैनिक नहीं,बल्कि मुसलमान थे ।'असलं धार्मिक तेढ पसरवणारं धादांत खोटं विधान करून भारतीय सेनेला धर्माची बिरुदं चिकटवण्याचा अधर्म केला.तर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे पक्ष प्रमुख असलेले दिवटे नेते अबू आझमी बलात्काराच्या गुन्ह्यातल्या आरोपीबरोबरच पीडित स्त्रीला पण फाशीची सजा देण्याची मागणी करू लागले.समाजवादी पक्षाच्या ह्या तिन्ही नेत्यांनी असली अ-समाजवादी विधानं करून,धर्माच्या नावाखाली अधर्म करून आपली बौद्धिक, नैतिक पातळी किती हीन आहे,याचं प्रत्यंतर घडवलं.नोएडा लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचा उमेदवार म्हणून उभा राहिलेला आणखी एक अतिशहाणा नेता,जो  पूर्वी आपण दुर्गा शक्ती नागपालला कसे चुटकी सरशी पदावरून दूर केले म्हणून वल्गना करीत होता,त्याने आपल्या कार्यकर्त्यांना, मतदान केंद्रांवर पोहोचून बूथ कॅप्चरिंग करा असले सल्ले दिले होते. थोडक्यात समाजवादी पक्ष गुंडांचा आणि पक्षाचा चेहरामोहरा पुंडाईचा आहे,तो शहाजोगपणे मुस्लिमांचा कैवारी म्हणून त्यांच्या डोक्यात भलते सलते भरवत सुटला आहे.ह्याच गैरसमजुतीतून मायावतींचा पक्ष-बहुजन समाज पार्टी -बसपा सुद्धा स्वत:ला मुस्लिमांचा कैवारी म्हणवून घेत स्वत:ला 'धर्मनिरपेक्ष' हे बिरुद लावून घेतो.काँग्रेसने तर स्वत:ला 'धर्मनिरपेक्ष' म्हणून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत केवळ मुस्लीमांचं लांगुलचालन आरंभलं असल्यामुळे  आणि त्या संकल्पनेचा जणू स्वामित्व हक्क त्यांच्याकडे असल्यागत  इतर सारे त्यांना सांप्रदायिक वाटतात.म्हणजे सोनिया गांधी इमामाकडे गेल्या तरी मुस्लिमांची मते सेक्युलर आणि बाकीचे सगळे सांप्रदायिक !

ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर,ज्याला खऱ्या अर्थाने 'धर्मनिरपेक्ष' म्हणता येईल अशा,सर्वधर्मसमभाव बाळगणाऱ्या व्यक्तीशी माझी नुकतीच भेट झाली आणि सत्तरी पार वय असलेल्या पण तरुणाईच्या झपाट्यानं निरपेक्षपणे काम करणाऱ्या झहीर शेख यांच्या कार्याविषयी मनात आदरभाव निर्माण झाला

गुजरातच्या दंग्यांबद्दल अपप्रचार करीत विरोधकांनी सतत नरेंद्र मोदी यांच्यावरटीकेची झोड उठवली , ते 'जहर की खेती' करत असल्याचे सवंग आरोप केले आणि मुस्लिम समाजाच्या मनात त्यांच्याबद्दल घृणा उत्पन्न करण्याचं राजकारण विरोधी पक्षांनी आणि नेत्यांनी आजतागायत केलं. हे तथाकथित आणि ढोंगी 'धर्मनिरपेक्ष' नेते गुजरातच्या दंग्यांबद्दलचे कपोलकल्पित सगळं कसं पद्धतशीरपणे मुस्लिम समाजाच्या मनात पेरत सुटले आहेत,म्हणून मुस्लिम समाजाला खरं काय; ते सांगण्यासाठी जामनगरमध्ये राहणाऱ्या झहीर शेख यांनी कंबर कसली.सुशासन,प्रगती आणि विकासाच्या वाटेवर चालत आपला देश जगातली महाशक्ती म्हणून ओळखला जावा म्हणून हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एक व्हावं,म्हणून मनात देशप्रेमाचा अखंड वाहणारा झरा घेऊन झहीर शेख बनारस मधल्या मुस्लिम समाजाचं प्रबोधन करताहेत .नरेंद्र मोदी ,भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांच्या प्रचार -प्रसारार्थ सध्या बनारस पिंजून काढत असलेल्या जामनगरच्या झहीर शेख यांनी तर आता तूर्तास बनारसलाच आपली कर्मभूमी मानली आहे. 

"मी २४ मार्च पासून काशी मध्ये मुक्कामाला आलोय आणि त्याच दिवशी पासून प्रचार करतोय . मुस्लिम समाजात शिया आणि सुन्नी असे दोन पंथ आहेत.आपल्या देशात शिया पंथीय मुस्लिम सुशिक्षित आणि उच्चशिक्षित आहेत.अटल बिहारी वाजपेयी यांना शिया पंथीय मुस्लिम लोकांनी आपला पाठींबा दिला होता आणि त्यांचा कल भाजपाकडे आहे .सुन्नी पंथीय मुस्लिम मात्र दुर्दैवानी अशिक्षित अथवा अत्यल्पशिक्षित आहेत.त्यांची मानसिकताही टोकाची आहे."झहीर शेख सांगतात. 
कदाचित धर्मांधतेची मानसिकता असलेल्या सुन्नी पंथीय मुस्लिम लोकांवरच बहुधा मुलायमसिंह आणि आझमखान यांसारखे नेते आपण मुस्लिमांचे कैवारी असल्याचे मायाजाल पसरवत असावेत. सुशिक्षितांच्या वाटेला ते कशाला जातील आणि सुशिक्षित त्यांच्या वाटेला कशाला जातील !माझ्या मनात विचार येतो.  

"काशी मध्ये ३ लाख मुस्लिम आहेत.ह्या तीन लाख मुस्लिमांपैकी ७५ हजार मुस्लिम शिया पंथीय आहेत आणि दोन लाख २७ हजार सुन्नी पंथीय मुस्लिम आहेत. ह्या मुस्लिम लोकांकडे मी जातोय . बनारस मध्ये घरोघरी जाऊन मी त्यांना सांगतोय की 'मोदी जी से डरने की जरुरत नहीं ।राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- RSS -तुम्हारी दुश्मन नहीं है । RSS की देश में ४१ हजार से भी ज्यादा शाखाएं हैं ,  वहां वें संस्कार और देशभक्ति सिखाते हैं ।' मात्र अनेक लोक मला म्हणतात की 'चाचा भाजपा के पक्ष में हैं ,कौम के गद्दार हैं । मोदी ने गुजरात के दंगों में संहार करवाया है। 'मी त्यांना विचारतो की बाबांनो तुम्ही गुजरातच्या दंग्यांबद्दल बोलता आहात,तुम्ही होता का त्यावेळी तिथे?नाही न?मी होतो!गुजरातच्या दंग्यांमध्ये मोदींचा हात नव्हता. सर्वोच्च न्यायालयापासून  सर्व प्रकारच्या यंत्रणांना मोदी दोषी आढळले नाहीत.१० वर्षे ह्या सगळ्या यंत्रणांनी सर्व बाजूंनी तपास केला,पण त्यांना मोदी दोषी आढळले नाहीत.स्वत: मोदी म्हणताहेत की मी जर गुन्हेगार असेन तर मला भर चौकात फाशीवर लटकवा !" झहीर शेख सांगतात. 
"लोक गुजरात दंग्यांबद्दल बोलू लागतात ,तेव्हा मी त्यांना विचारतो,देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून १९४७ ते आतापावेतो देशात ११ हजारांपेक्षा जास्त दंगे झाले,हे तुम्हाला माहितेय का ? तुम्हाला गोध्रा हत्याकांड माहितेय का?मी त्या लोकांना सांगतो की तुमची गरीबी आणि अज्ञानता ह्या मागे शिक्षणाचा अभाव हेच एकमेव कारण आहे .मी आज सत्तर वर्षांपेक्षा अधिक वयाचा आहे .पुढच्या निवडणुकीच्या वेळी मी  प्रचार -प्रसारासाठी सक्षम असेन अथवा नाही,हे मला ठावूक नाही.आज मात्र मी आपलं राष्ट्रीय कर्तव्य मानून स्वत: खर्च सोसून तन- मन -धनाने देशात भाजपा बहुमताने निवडून यावी,मोदी पंतप्रधान व्हावेत आणि देश काँग्रेसमुक्त होऊन प्रगतीपथावर जाऊन महाशक्ती बनावा ,म्हणून वाराणसीमध्ये मुस्लिम समाजाचं प्रबोधन करतो आहे ."झहीर शेख सांगतात. 

"हमारा खुदा परवरदिगार कुराण में फर्माता है कि 'मैने तुमको जिस धरती पर पैदा किया ,जहाँ के नदियोंका पानी पीकर तुम पले और बढ़े हो ,जहाँ की हवाओंकी सास तुम लेते हो  और जहाँ के खेतोंमें पैदा हुआ अनाज खाकर तुम जिन्दा हो,उस धरती से ,उस माँ भूम भारत से और अपने वतन हिंदुस्तान से तुम गद्दारी करोगे,तो मुझे कसम है अपने जलाल की;मैं क़यामत के रोज आप लोगोंको माफ़ नहीं करूंगा।'विरोधी पार्टीयाँ,मुलायम,मायावती मुस्लीमों से कहते हैं कि मोदी प्रधानमंत्री बन जायेंगे तो भारत के अंदर एक एक गावोंमे दंगा -फ़साद होगा। मैने मुस्लिम समाज को कहा कि भाई ,अखंड हिंदुस्तान का टुकडा किसने किया?धर्म के नाम पर जमीन का बँटवारा किसने किया?तब मोदी थे क्या ? तो फिर मोदी जी से क्यों डर रहे हो?भाजपा सुशासन व विकास के नाम पर चुनाव ल रही है ।उनका मतलब देश में विभाजन कराना नहीं है ।नरेंद्र मोदी सबको एक करके देश को महाशक्ती बनाना चाह रहे हैं ।भाई-भाई एक हो जाएं यह चाह रहे हैं।" झहीर शेख सांगतात.त्यांच्या पत्नी कुलसुम शेख ह्यांनी सुद्धा प्रकृतीच्या कुरबुरीमुळे जामनगर मध्येच,प्रकृतीला झेपेल तितका भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी मुस्लिम समाजात प्रचाराचा खारीचा वाटा उचलला आहे.त्या दोघांच्या प्रयत्नांना यश आले आहे .आता तर जामनगर मध्ये मुस्लिम युवक सुद्धा गुजरातच्या मतदारांना नरेन्द्रभाई मोदी यांना 'वडाप्रधान' बनवा म्हणून जाहीर आवाहन करताहेत.गुजरातच्या नरेन्द्रभाई मोदी यांनी 'वडाप्रधान' व्हावं आणि दिल्लीत जावं म्हणून वयाची सत्तरी पार केलेले झहीर शेख कुठल्याही प्रलोभनाशिवाय,स्वयंप्रेरणेनं  उत्तरप्रदेशात -काशीत नरेंद्र मोदी ,भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांच्या प्रचार -प्रसारार्थ मुस्लिम समाजाचं प्रबोधन करण्यात बुडून गेले आहेत .

हे बंध रेशमाचे … 
उत्तर प्रदेशानं देशाला १४ पंतप्रधानांपैकी ८ पंतप्रधान दिले आहेत आणि लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजे ८० जागा उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्याबाबतीत उत्तरप्रदेशाला कमालीचे  महत्व आहे. देशातली २५ टक्के मतदारांची मते उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांत मिळून असल्यामुळे आणि एकट्या उत्तर प्रदेशात देशभरातल्या एकूण  मतदारांपैकी १६ टक्के मतदारांची मते असल्यामुळे उत्तर प्रदेशाला लोकसभा निवडणुकांच्याबाबतीत अनन्यसाधारण महत्व आहे. 
-रश्मी घटवाई 

वाराणसी ही वरुणा आणि अस्सी ह्या दोन नद्यांच्या संगमाची नगरी आहे.वामन पुराणानुसार वरुणा आणि अस्सी ह्या दोन नद्या साक्षात परमेश्वराच्या व्यक्त शरीरातून,काळाबरोबरच अस्तित्वात आल्या.ह्या पवित्रतम स्थानाला साक्षात शिव-पार्वतीनं निर्मिलं आणि तिथेच त्यांनी वास्तव्य केलं.वरुणा आणि अस्सी ह्या दोन नद्यांच्या संगमाची नगरी म्हणून तिचं नाव वाराणसी.ती "काशी"म्हणून ओळखली गेली आणि ह्या शिवनगरीला शिव कधीही सोडून जात नाहीत,म्हणून ती अविमुक्ता,आनंदवन,रुद्रवन म्हणूनही ओळखली गेली.तिचं धार्मिक आणि अध्यात्मिक महात्म्य अपरंपार आहे,तसंच अभिजात उत्तर हिंदुस्तानी संगीत आणि वस्त्र -प्रावरणं-विशेषत:बनारसी रेशमी साड्या यांच्यासाठीही वाराणसी  सुप्रसिद्ध आहे.

सध्या वाराणसीत प्रत्येक मुखात पानाबरोबरच राजकारण चघळले जाते आहे,रंगते आहे. मुळात वाराणसीत लुटुपुटीचे,पुचाट,मिळमिळीत असे काही नसतेच!प्रतिस्पर्ध्याला आव्हान देत उतरावे,ते आखाड्याच्या लाल मातीत!स्नान करावे,तर गंगाकिनारी!पूजावे,ते काशी-विश्वेश्वराला! न्याहारीत शुद्ध तुपातली गरम-गरम जिलबी-रबडी हाणावी,लोटाभर दूध रिचवावे!सगळे काही 'तबियत से'!अंतर्बाह्य वाराणसीकराला वरवरचे,पोकळ,कमअस्सल असले काही रुचत नाही; नाणे कसे खणखणीत वाजायला हवे!

36,82,194 लोकसंख्येच्या वाराणसी नगरीनं 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत,"न दागी हैं  न दोषी हैं,मुरली मनोहर जोशी हैं,ही घोषणा देणाऱ्या डॉ.मुरली मनोहर जोशी यांना 2,03,122 मते देऊन-टक्केवारीच्या भाषेत  30.52 टक्के मते देऊन विजयी केलं .2009 मध्ये डॉ.मुरली मनोहर जोशी यांना"श्रेष्ठ संसद"ह्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.त्यांनी पराभूत केलेला 1,85,911 मते-27.94 टक्के मिळवून द्वितीय स्थानावर आलेला प्रतिस्पर्धी बहुजन समाज पार्टी (बसपा)चा उमेदवार मुख्तार अन्सारी मात्र "दागी है और दोषी भी है".त्यामुळेच बहनजींनी त्याची हकालपट्टी केली.दागी आणि दोषी असलेला हा गुंडपुंड स्वत:चा पक्ष स्थापून 2012 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मउमधून चवथ्यांदा जिंकला.भारतात राजकारणात गुंडपुंड असल्याचं हे मूर्तीमंत उदाहरण.जनतेनंच पोटतिडकीनं अशा गुंडापुंडांना राजकारणातून हद्दपार केलं पाहिजे. गुंडपुंड असूनही वाराणसीतली 15.9 टक्के मुस्लिम मते त्याला मिळतात,म्हणजे मुस्लिम मतदाताच नव्हे;तर भाजपाच्या विरोधातले अन्य किती लोक किती डोळेझाक करून बेजबाबदारपणे मतदान करतात,हे लक्षात येतं.तिसऱ्या स्थानावर समाजवादी पार्टीच्या अजय राय ह्या उमेदवाराला 1,23,874  म्हणजे18.61  टक्के मते मिळाली;तर 2009च्या सार्वत्रिक निवडणुकीत,2004 च्या निवडणुकीत जिंकलेल्या डॉ. राजेश कुमार मिश्रा ह्या काँग्रेसच्या उमेदवाराला, वाराणसीतून दिल्या गेलेल्या एकूण 6,65,490 मतांपैकी अवघी 66,386  म्हणजे 9.98 टक्के मते मिळाली आणि चवथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. 

१६व्या लोकसभेसाठीची 2014 सालची ही निवडणूक ह्यावेळी 'काही वेगळी 'असल्याचं जाणवतंय , कारण गेल्या दहा वर्षांत भ्रष्टाचारी काँग्रेसप्रणित सरकारनं लाखो करोडो रुपयांचे घोटाळे करून सर्वसामान्य माणसाला जगणं कठीण करून सोडलं.कोळसा घोटाळा तर ह्या सर्वांचा राजा!त्यामुळे जनता आता हे भ्रष्ट सरकार उलथून टाकायला अगदी आतुर झालेली आहे आणि प्रत्येक जण घरचं कार्य असल्यागत निवडणुकीकडे बघतोय!चीननं केलेल्या त्यांच्या सैनिकांच्या भारतातल्या घुसखोरीच्या आणि भूभागावारच्या अतिक्रमणाच्या संदर्भात काँग्रेसप्रणित सरकारनं घेतलेली पुचाट भूमिका पाहता सर्वसामान्य माणसाला मोदींमध्येच आपला आणि देशाचा तारणहार दिसतो आहे . पर्यावरणाच्या संदर्भात म्हटलं जातं की थिंक ग्लोबली अ‍ॅन्ड अ‍ॅक्ट लोकली . म्हणजे मोठ्या घटकाचा विचार करीत लहान घटकावर काम करायचं .भाजपाच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना पण सध्या पर्यावरणाच्या ह्या सूत्राचा आधार घ्यावासा वाटतो आहे .भाजपाच्या कुठल्याही उमेदवाराला मत द्यायचं ते मोदींना डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांना पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवण्यासाठीच;ह्या कल्पनेनं भाजपाचा मतदार प्रेरित झालेला आहे.वाराणसीची जनता मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून देण्यास निवडून उत्सुक आहे;मात्र दोन जागांवरून निवडणूक लढवणाऱ्या मोदींनी आपल्याला वाऱ्यावर सोडून देऊ नये,हे वाराणसीचे बंध रेशमाचे जपावेत,ही त्यांची अपेक्षा आहे.तसेही उत्तर प्रदेशानं देशाला १४ पंतप्रधानांपैकी ८ पंतप्रधान दिले आहेत आणि लोकसभेच्या सर्वाधिक म्हणजे ८० जागा उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्याबाबतीत उत्तर प्रदेशाला कमालीचे  महत्व आहे. देशातली २५ टक्के मतदारांची मते उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांत मिळून असल्यामुळे आणि एकट्या उत्तर प्रदेशात देशभरातल्या एकूण मतदारांपैकी १६ टक्के मतदारांची मते असल्यामुळे उत्तरप्रदेशाला लोकसभा निवडणुकांच्याबाबतीत अनन्यसाधारण महत्व आहे. 

             
कोळसा घोटाळ्यात, आदर्श घोटाळ्यात आणि अन्य अनेक घोटाळ्यांत  लिप्त असूनही लाजलज्जा सोडलेल्या काँग्रेसनं  तसं तर ह्या निवडणुकीत आपण सपशेल हारणार हे गृहीत धरलं आहे आणि वारा येईल त्या दिशेला शीड वळवणारे त्यांचे दिग्गज शेंदाड शिपाई आधीच निवडणुकीच्या रणांगणातून कोणी कुठले कारण देऊन तर कोणी आणखी कुठले-पळ काढते झालेत!काँग्रेसच्या पापात वाटेकरी असलेल्या त्यांच्या सरकारातल्या साथीदारांनीही बदलत्या वाऱ्याची दिशा बघून अन्यत्र चाचपणी सुरू केली.आपण जिंकणार नाही ,हे स्वच्छ दिसत असताना कुणी मतदानाची शाई पुसून चलाखीनं पुन्हा दुसऱ्यांदा मतदान करण्याचे सल्ले दिले!कदाचित आतापावेतो ते जिंकून येण्यामागे हेच गमक असावं ! चंद्रबळ आणून काँग्रेसनं शेवटच्या स्लॉग ओव्हर्स मध्ये जनमत आपल्या बाजूने वळवायचा एक केविलवाणा प्रयत्न करून पाहिलाय ,पण शेवटी काँग्रेस समजतेय तेवढी भारताची जनता खुळी नाहीये .काँग्रेसची सहावी यादी प्रसिद्ध झाली,त्यात आणि आता हा लेख लिहितेवेळीसुद्धा, वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही .

बसपा आणि सपा यांच्यामधून विस्तव जात नाही ,कोणाची पुंडाई अधिक हे ठरवणे अवघड ,मात्र ह्या पक्षानं उमेदवारी दिली नाही तर त्या पक्षात जाणाऱ्या आयाराम-गयाराम मंडळीसाठी बहुधा दोन्ही पक्षांचा स्तर एक असावा .(उत्तर प्रदेशातल्या नोएडा लोकसभा मतदारसंघातल्या मागच्या निवडणुकीत बसपाच्या तिकिटावर जिंकलेल्या खासदारानं आता सपाचा आसरा घेतला आहे. ) वाराणसीमधून गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सपाकडून  निवडणूक लढवलेला उमेदवार आता काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याची स्वप्नं बघतो आहे आणि दुसऱ्याच पक्षातर्फे वाराणसीमधून गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत  निवडणूक लढवलेल्या उमेदवाराला आता बसपानं नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी देऊ केली आहे. वाराणसीच्या निवडणुकीच्या आखाड्यात भाजपा  
च्या  नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बसपाकडून विजय प्रकाश जयस्वाल,सपाकडून कैलाश चौरासिया, स्वतंत्र उमेदवार मुख्तार अन्सारी ,तृणमूल काँग्रेसकडून इंदिरा तिवारी ,सीपीआयएम कडून हिरालाल यादव ,आम आदमी पार्टीचे अरविंद केजडीवाल  निवडणूक लढवताहेत . 

निवडणुकांमध्ये कुठल्याच पक्षाला कमी लेखून चालणार नाही ,हे जरी खरे असले तरी स्वत:च्या वक्तव्यांवर स्वत:च घूमजाव करणारे,कोलांट उड्या मारणारे अरविंद केजडीवाल वाराणसीत जाऊन खरे म्हणजे थट्टेचा विषय बनले.त्यांच्या समवेत अजिबात गर्दी नव्हती,जे कोणी त्यांच्या समवेत होते,ते दिल्लीहून त्यांनी आणलेले होते.वाराणसी मधले स्थानिक नव्हतेच असे वाराणसी मधले लोक सांगताहेत . न्यूज मध्ये राहण्यासाठी त्यांनी स्वत:च आपल्या पक्षाच्या लोकांकडून शाई आणि अंडी स्वत:वर फेकून घेतलीत . मागे योगेंद्र यादव यांच्या तोंडाला काळे फासणारा दुसरा तिसरा प्रकार नसून न्यूज मध्ये राहण्यासाठी त्यांनी स्वत:च आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून काळे फासून घेतले असावे,म्हणून तर त्यांनी त्याच्या विरोधात तक्रार केली नाही ! वाराणसीमधल्या  तथाकथित गर्दीचे त्यांनी आपल्या वेबसाईट वर टाकलेले फोटो म्हणजे फोटोशॉपची कृपा असल्याचं उघडकीला आलं. त्यांचे 'फंड रेझिंग 'डिनर्स म्हणजे दुसरे तिसरे काही नसून काळा पैसा पांढरा करण्याची शक्कल असल्याची लोकांची ठाम धारणा आहे. अरविंद केजडीवाल चोर चोर म्हणून आपले बोट प्रत्येकाकडे रोखताहेत ,त्यावेळी त्यांच्या  पंजाची तीन बोटे त्यांच्याचकडे रोखलेली आहेत,हे ते विसरतात .राहता राहिला अंगठा!तो मात्र वाराणसी मधले  मतदार त्यांना दाखवणार आहेतच!

हर हर महादेव 
-रश्मी घटवाई 

"सुरतनु जिमण अने काशीनु मरण "असं गुजरातमध्ये म्हटलं जातं.म्हणजे जेवावं ते सुरतेला-इतकं सुग्रास आणि वैविध्यपूर्ण भोजन तिथे मिळतं आणि पुण्यसंचय घडून शेवटचा श्वास घेतला जावा,तो जगातल्या प्राचीनतम धार्मिक स्थानी काशीमध्ये!मनात अपिरीमित श्रद्धाभाव घेऊन वाराणसीमध्ये  गंगातीरी स्नान करावं,नंतर तीन हजार वर्षांपूर्वी स्थापिलेल्या काशीविश्वेश्वराच्या मंदिरातल्या ज्योतिर्लिंगाच्या -महादेवाच्या पावन दर्शनानं भक्तिरसाचं आकंठ पान घडावं, गंगेच्या तीरावरच्या ३६५ घाटांपैकी मुख्य८४ घाटांपैकीच्या दशाश्वमेध घाटाच्या साक्षीनं सायंकाळी गंगेची आरती अनुभवावी.  वाराणसीत एकदा जाऊन आलेल्या कुठल्याही सश्रद्ध भारतीय मनाला वाराणसी पुन्हापुन्हा बोलावते.  वाराणसीतली पराकोटीची घाण,कमालीची अस्वच्छता,खराब रस्ते आणि एकूणच शहरात असलेली बेशिस्त ह्या सगळ्या गोष्टी काशीविश्वेश्वरापुढे गौण आहेत. काशी उर्फ वाराणसी नगरीला सगळं माफ आहे!सगळ्यात कहर म्हणजे तहान लागली तर गंगेच्या तीरावर आपल्याला पेयजलाची बाटली विकत घ्यावी लागते!भगवान शंकराच्या जटेतून वाहणारी गंगा मैली हो गयी,पापियों के पाप धोते धोते, हे जितकं खरं;तितकंच गंगेत लोटल्या जाणाऱ्या sewage -मैला वगैरेमुळे तिचं पाणी प्रदूषित झालेलं आहे हेही खरं!गंगेनं कुठे आणि कुणाकडे दाद मागायची बरं !   

सध्या वाराणसी मध्ये केवळ आणि केवळ निवडणुकांचं वारं वाहतंय. १६ व्या लोकसभा निवडणुकीच्या नऊ टप्प्यांपैकी वाराणसीमध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजे १२ मे रोजी मतदान व्हायचे आहे.वाराणसीमध्ये भाजपाचा उमेदवार कोण असणार ह्यावर सर्वच प्रसार माध्यमांमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. "डॉ. मुरली मनोहर जोशी विरुद्ध नरेंद्र मोदी "यांवर चर्चा वितंडवाद झडताहेत आणि  प्रसार माध्यमांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया ऐकायला येताहेत. वाराणसीतल्या माझ्या चार-पाच दिवसांच्या माझ्या मुक्कामात अनेकांशी मी विस्तृत संवाद साधला होता.वाराणसीतल्या रामनगर किल्ल्यानजिक एका टी-स्टॉलवर ८ मार्च रोजी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांच्या 'चाय पे चर्चा " चं आयोजन केलं गेलं होतं .तिथे अतिशय उत्साही तरुणांचा समूह कार्यरत होता .रामनगरचा किल्ला बघून मी बाहेर पडले तर तिथे हे दृश्य दिसलं .मी त्या सर्वांशी संवाद आरंभला. त्या सगळ्यांच्या मते भारतभर मोदी लहर आहे. वाराणसीमध्ये भगवा झेंडा फडकेल,'हर हर महादेव 'ललकारी गुंजेल म्हणजेच भाजपा जिंकेल असं त्या सर्वांचं म्हणणं आहे. 
     
वाराणसीतले डॉ अनुपम गुप्ता ह्यांनी कायद्यात डॉक्टरेट मिळवली असून ते आकाशवाणीच्या वाराणसी केंद्रात निवेदक आहेत."डॉ. मुरली मनोहर जोशी विरुद्ध नरेंद्र मोदी हे हेतुत: पसरवलं जातंय.जाणून बुजून मिडीयामध्ये अशा बातम्या पसरवल्या जाताहेत की डॉ. मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी ह्यांच्यामध्ये वाराणसीमधून निवडणूक लढवण्यावरून नाराजी आहे किंवा त्यांच्यात तेढ निर्माण झालीये आणि उभयतांच्या समर्थकांमध्ये हाणामाऱ्या होताहेत वगैरे. तसं काहीही नाहीये.सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या दृष्टीसमोर कमळ आहे.वाराणसीतून भाजपाचा उमेदवार जिंकावा यासाठी तो झटतो आहे.भाजपाची सीट टिकवून ठेवणे हे कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट्य आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी भाजपाचे उमेदवार घोषित झाले तरीही तो कार्य करणार आणि नरेंद्र मोदी वाराणसीतले भाजपाचे उमेदवार म्हणून उभे रहाणार असले तरीही तो कार्य करणार आहे. मिडीयाच्या ह्या असल्या अपप्रचारामुळे फार फार तर काही किरकोळ मतदारांच्या मनात संभ्रम उत्पन्न होईल;मात्र सगळ्यांना ह्या असल्या बातम्यांमागचं सत्य ठावूक आहे. भाजपानं -डॉ .मुरली मनोहर जोशी ह्यांनी मागच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या सिटिंग एमपीला हरवून वाराणसीमधून विजय मिळवला होता." डॉ अनुपम गुप्ता सांगतात .नरेंद्र मोदी वाराणसीतले भाजपाचे उमेदवार म्हणून उभे रहाणार असले तर बसपाचे मुख्तार अन्सारी त्यांच्या विरोधात उभे राहणार म्हणून सांगताहेत,त्याबद्दल मी त्यांना विचारलं.कारण आमदार मुख्तार अन्सारी गेल्या सातेक वर्षांपासून पोलिस कस्टडीत तुरुंगात असून त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यावर डॉ अनुपम गुप्ता विस्तृतपणे भाष्य करतात की अद्याप मुख्तार अन्सारीच्या बाबतीत सजा सुनावली गेली नाहीये ,त्यामुळे ती व्यक्ती निवडणूक लढवू शकेल.सर्वोच्च न्यायालयाने १० जुलै दिलेल्या निर्णयाबद्दल तसंच संसदेनं घेतलेल्या ह्यासंदर्भातल्या पवित्र्याबद्दल, लालू तुरुंगातून बाहेर आल्याबद्दल सर्वसाधारण भारतीय अजूनही बुचकळ्यात पडला आहे,एवढं नक्की!मात्र "मतांचं ध्रुवीकरण होईल आणि हिंदू मते भाजपाच्या उमेदवाराच्याच पारड्यात पडतील,"असा ठाम विश्वास डॉ अनुपम गुप्ता यांना वाटतो . 
 
"यहां हर हर महादेव नारा गूंजेगा " भाजयुमोचे वाराणसीचे जिल्हाध्यक्ष संतोष द्विवेदी सांगतात . त्यांच्यामते मोदी की जोशी हा वाद मिडियानं मुद्दाम निर्माण केलाय."डॉ .मुरली मनोहर जोशी और नरेंद्र मोदी इनमें कोई मनमुटावभी नहीं है। वाराणसीच्या सीटवरून दोघांमध्ये काही कलह नाही, भाजपा मध्येही काही अंतर्गत रणकंदन होत नाहीये ;पण मीडियात मात्र असल्या बातम्या येताहेत" संतोष द्विवेदी सांगतात .त्यांना मी विचारलं , नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अरविंद केजडीवाल निवडणूक लढवणार आहेत.जर का भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वाराणसीमधूननिवडणूक लढवणार असतील तर काय चित्र दिसेल,ह्यावर त्यांच्या मते इथे वाराणसीमध्ये आम आदमी पार्टीला कोणी ओळखतही नाही की पुसतही नाही! "अरविंद केजडीवाल ह्यांना तर वाराणसी चिमूटभर पण धूप घालणार नाही!वाराणसी म्हणजे काही दिल्ली नव्हे किंवा गाझियाबाद नव्हे की इथे केजडीवाल ह्यांना मतं पडतील.यह पूर्वांचल है। उनको या 'आप 'को यहां तिनकेभरभी नहीं पहचानता कोई!" द्विवेदी सांगतात .  
"कितनी अजीब बात है की पिछले १० सालो से काँग्रेस इस देश को चला रही है और कई हजार करोड़ के घोटाले हुए |लेकिन केजरीवाल नरेंद्र मोदी के खिलाफ मोर्चा खोले है । "रामनगर किल्ल्यानजिकच्या त्याटी-स्टॉलवर भेटलेला अर्जुन सिंह हा उत्साही युवक सांगतो. "आपल्या भारत देशाला एकेकाळी सोने की चिडिया  म्हटलं जायचं .मात्र आधी ब्रिटिशांनी भारताला लुटलं आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं. मला इथे गांधीजींच्या त्या वक्तव्याची आठवण होते,त्यांनी म्हटलं होतं की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस पक्षाचं काही प्रयोजन नाही ,ती बरखास्त केली गेली जायला हवी .यूपीए सरकारनं अनेक घोटाळे केलेत. कोळसा घोटाळा,टेलिकॉम घोटाळा …घोटाळ्यांची ही यादी नं संपणारी आहे. राहुल गांधी काहीबाही दावे करताहेत की आम्ही अमुक केलं न तमुक केलं !माझ्यामते घोटाळे करणाऱ्या काँग्रेसला राजकारणाच्या पटावरून गायब करण्याची हीच  वेळ आहे. "अर्जुन सिंह सांगतो. 

त्या सगळ्या उत्साही तरुणांना मी विचारलं ,की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अरविंद केजडीवाल निवडणूक लढवणार आहेत, तेव्हा काय होईल,त्यावर ती सगळी तरुण मुले एकमुखानी म्हणाली,की "हम तो चाहते हैं, कि नरेंद्र मोदी वाराणसी से चुनाव लडें,और वाराणसी में उनके विरुद्ध अरविंद केजडीवाल चुनाव लडें!केजडीवाल कहते रहते हैं,हमारी औकातही क्या है !वाराणसी में उन्हें उनकी औकातही क्या है,इसका पता चल जायेगा! आम्हाला तर हवंय की केजडीवाल ह्यांनीवाराणसीमध्ये नरेंद्र मोदी ह्यांच्या विरोधात निवडणूक लढवावी म्हणजे त्यांना कळेलच,की आपली किती पत आहे ते!" एकुणातच हंसो हंस:;बको बक: हे सिद्ध करायला ही तरुणाई उत्सुक आहे .  
    
 

दशाश्वमेध घाट   
    

वाराणसीतल्या रामनगर किल्ल्यानजिक एका टी-स्टॉलवर ८ मार्च रोजी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांच्या 'चाय पे चर्चा " चं आयोजन करणारे उत्साही युवक 
 Photo

---------------------------------------------------------------------