सर्वधर्मसमभाव
रश्मी घटवाई
उत्तर प्रदेशातल्या काही राजकारणी नेत्यांनी अल्पसंख्यकांचं तुष्टीकरण करण्याच्या नादात एवढ्यात अतिशय वादग्रस्त विधानं केलीत.मुलायम सिंह यांच्या मनात एकाएकी बलात्काराच्या अपराधात दोषी ठरलेल्या आरोपींबाबत कणव दाटून आली आणि मुरादाबाद इथल्या एका निवडणुकीच्या प्रचारसभेत त्यांनी त्या दोषी आरोपींना फाशीची सजा झाल्याबद्दल अश्रू ढाळले.त्यांची फाशीची सजा रद्द होऊन त्यांना सौम्य शिक्षा व्हावी या अर्थाचा पुरस्कार करताना 'मुलेच ती …मुलांकडून कधी कधी चुका घडणारच!'‘लड़कों से गलती हो जाया करती है।’असली तद्दन बलात्कारासारख्या गुन्ह्याची आणि गुन्हेगारांची पाठराखण करणारी विधानं केलीत .मुंबईतल्या शक्ती मिल्स गॅंगरेप प्रकरणातल्या विजय जाधव,कासिम बंगाली ,सलीम अन्सारी, सिराज रेहमान ह्या गुन्हेगारांच्या नावांवर जरी कुणी नजर टाकली,तरी मुलायम सिंह यांना हा उमाळा येण्यामागचे कारण लक्षात येईल .ही क्षुद्र मानसिकता कशासाठी,तर अल्पसंख्यकांच्या मतांसाठी !आपणच काय ते त्यांचे तारणहार ह्याच अविर्भावात ते सतत वावरत असतात.त्यांच्या उत्कर्षासाठी आणि गरीब बिचाऱ्या अल्पसंख्यकांच्यासाठी कार्य करणारे ह्या भूतलावर आपणच काय ते एकमेव नेते आहोत आणि म्हणून ह्या अल्पशिक्षित समाजानं आपल्याला आणि पक्षाला एकगठ्ठा मते देऊन निवडून आणावं,म्हणून प्रसंगी लाचार,अगतिक होऊन, तर कधी दंडेलशाही करून येनकेन प्रकारेण ते अल्पसंख्यक समुदायावर आपली पकड ठेवू पहातात. मौलाना मुलायम असंच त्यांना म्हटलं जातं.आझमखान हे उत्तर प्रदेशातले आणखी एक रत्न,ज्यानं भारत माता 'डायन' असल्याबद्दल म्हटलं होतं ,गाझियाबाद मध्ये निवडणुकीच्या प्रचारसभेत, कारगिलच्या लढाईत विजय मिळवण्यासाठी लढायला गेलेले हिंदू सैनिक नसून मुस्लिम सैनिक होते. 'कारगिल की पहाडियोंको फ़तेह करणे वाले हिंदू सैनिक नहीं,बल्कि मुसलमान थे ।'असलं धार्मिक तेढ पसरवणारं धादांत खोटं विधान करून भारतीय सेनेला धर्माची बिरुदं चिकटवण्याचा अधर्म केला.तर समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे पक्ष प्रमुख असलेले दिवटे नेते अबू आझमी बलात्काराच्या गुन्ह्यातल्या आरोपीबरोबरच पीडित स्त्रीला पण फाशीची सजा देण्याची मागणी करू लागले.समाजवादी पक्षाच्या ह्या तिन्ही नेत्यांनी असली अ-समाजवादी विधानं करून,धर्माच्या नावाखाली अधर्म करून आपली बौद्धिक, नैतिक पातळी किती हीन आहे,याचं प्रत्यंतर घडवलं.नोएडा लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचा उमेदवार म्हणून उभा राहिलेला आणखी एक अतिशहाणा नेता,जो पूर्वी आपण दुर्गा शक्ती नागपालला कसे चुटकी सरशी पदावरून दूर केले म्हणून वल्गना करीत होता,त्याने आपल्या कार्यकर्त्यांना, मतदान केंद्रांवर पोहोचून बूथ कॅप्चरिंग करा असले सल्ले दिले होते. थोडक्यात समाजवादी पक्ष गुंडांचा आणि पक्षाचा चेहरामोहरा पुंडाईचा आहे,तो शहाजोगपणे मुस्लिमांचा कैवारी म्हणून त्यांच्या डोक्यात भलते सलते भरवत सुटला आहे.ह्याच गैरसमजुतीतून मायावतींचा पक्ष-बहुजन समाज पार्टी -बसपा सुद्धा स्वत:ला मुस्लिमांचा कैवारी म्हणवून घेत स्वत:ला 'धर्मनिरपेक्ष' हे बिरुद लावून घेतो.काँग्रेसने तर स्वत:ला 'धर्मनिरपेक्ष' म्हणून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत केवळ मुस्लीमांचं लांगुलचालन आरंभलं असल्यामुळे आणि त्या संकल्पनेचा जणू स्वामित्व हक्क त्यांच्याकडे असल्यागत इतर सारे त्यांना सांप्रदायिक वाटतात.म्हणजे सोनिया गांधी इमामाकडे गेल्या तरी मुस्लिमांची मते सेक्युलर आणि बाकीचे सगळे सांप्रदायिक !
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर,ज्याला खऱ्या अर्थाने 'धर्मनिरपेक्ष' म्हणता येईल अशा,सर्वधर्मसमभाव बाळगणाऱ्या व्यक्तीशी माझी नुकतीच भेट झाली आणि सत्तरी पार वय असलेल्या पण तरुणाईच्या झपाट्यानं निरपेक्षपणे काम करणाऱ्या झहीर शेख यांच्या कार्याविषयी मनात आदरभाव निर्माण झाला
गुजरातच्या दंग्यांबद्दल अपप्रचार करीत विरोधकांनी सतत नरेंद्र मो दी यांच्यावरटीकेची झोड उठवली , ते 'जहर की खेती' करत असल्याचे सवंग आरोप केले आणि मुस्लिम समाजाच्या मनात त्यांच्याबद्दल घृणा उत्पन्न करण्याचं राजकारण विरोधी पक्षांनी आणि नेत्यांनी आजतागायत केलं. हे तथाकथित आणि ढोंगी 'धर्मनिरपेक्ष' नेते गुजरातच्या दंग्यांबद्दलचे कपोलकल्पित सगळं कसं पद्धतशीरपणे मुस्लिम समाजाच्या मनात पेरत सुटले आहेत,म्हणून मुस्लिम समाजाला खरं काय; ते सांगण्यासाठी जामनगरमध्ये राहणाऱ्या झहीर शेख यांनी कंबर कसली.सुशासन,प्रगती आणि विकासाच्या वाटेवर चालत आपला देश जगातली महाशक्ती म्हणून ओळखला जावा म्हणून हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एक व्हावं,म्हणून मनात देशप्रेमाचा अखंड वाहणारा झरा घेऊन झहीर शेख बनारस मधल्या मुस्लिम समाजाचं प्रबोधन करताहेत .नरेंद्र मोदी ,भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांच्या प्रचार -प्रसारार्थ सध्या बनारस पिंजून काढत असलेल्या जामनगरच्या झहीर शेख यांनी तर आता तूर्तास बनारसलाच आपली कर्मभूमी मानली आहे.
"मी २४ मार्च पासून काशी मध्ये मुक्कामाला आलोय आणि त्याच दिवशी पासून प्रचार करतोय . मुस्लिम समाजात शिया आणि सुन्नी असे दोन पंथ आहेत.आपल्या देशात शिया पंथीय मुस्लिम सुशिक्षित आणि उच्चशिक्षित आहेत.अटल बिहारी वाजपेयी यांना शिया पंथीय मुस्लिम लोकांनी आपला पाठींबा दिला होता आणि त्यांचा कल भाजपाकडे आहे .सुन्नी पंथीय मुस्लिम मात्र दुर्दैवानी अशिक्षित अथवा अत्यल्पशिक्षित आहेत.त्यांची मानसिकताही टोकाची आहे."झहीर शेख सांगतात.
कदाचित धर्मांधतेची मानसिकता असलेल्या सुन्नी पंथीय मुस्लिम लोकांवरच बहुधा मुलायमसिंह आणि आझमखान यांसारखे नेते आपण मुस्लिमांचे कैवारी असल्याचे मायाजाल पसरवत असावेत. सुशिक्षितांच्या वाटेला ते कशाला जातील आणि सुशिक्षित त्यांच्या वाटेला कशाला जातील !माझ्या मनात विचार येतो.
"काशी मध्ये ३ लाख मुस्लिम आहेत.ह्या तीन लाख मुस्लिमांपैकी ७५ हजार मुस्लिम शिया पंथीय आहेत आणि दोन लाख २७ हजार सुन्नी पंथीय मुस्लिम आहेत. ह्या मुस्लिम लोकांकडे मी जातोय . बनारस मध्ये घरोघरी जाऊन मी त्यांना सांगतोय की 'मोदी जी से डरने की जरुरत नहीं ।राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- RSS -तुम्हारी दुश्मन नहीं है । RSS की देश में ४१ हजार से भी ज्यादा शाखाएं हैं , वहां वें संस्कार और देशभक्ति सिखाते हैं ।' मात्र अनेक लोक मला म्हणतात की 'चाचा भाजपा के पक्ष में हैं ,कौम के गद्दार हैं । मोदी ने गुजरात के दंगों में संहार करवाया है। 'मी त्यांना विचारतो की बाबांनो तुम्ही गुजरातच्या दंग्यांबद्दल बोलता आहात,तुम्ही होता का त्यावेळी तिथे?नाही न?मी होतो!गुजरातच्या दंग्यांमध्ये मोदींचा हात नव्हता. सर्वोच्च न्यायालयापासून सर्व प्रकारच्या यंत्रणांना मोदी दोषी आढळले नाहीत.१० वर्षे ह्या सगळ्या यंत्रणांनी सर्व बाजूंनी तपास केला,पण त्यांना मोदी दोषी आढळले नाहीत.स्वत: मोदी म्हणताहेत की मी जर गुन्हेगार असेन तर मला भर चौकात फाशीवर लटकवा !" झहीर शेख सांगतात.
"लोक गुजरात दंग्यांबद्दल बोलू लागतात ,तेव्हा मी त्यांना विचारतो,देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून १९४७ ते आतापावेतो देशात ११ हजारांपेक्षा जास्त दंगे झाले,हे तुम्हाला माहितेय का ? तुम्हाला गोध्रा हत्याकांड माहितेय का?मी त्या लोकांना सांगतो की तुमची गरीबी आणि अज्ञानता ह्या मागे शिक्षणाचा अभाव हेच एकमेव कारण आहे .मी आज सत्तर वर्षांपेक्षा अधिक वयाचा आहे .पुढच्या निवडणुकीच्या वेळी मी प्रचार -प्रसारासाठी सक्षम असेन अथवा नाही,हे मला ठावूक नाही.आज मात्र मी आपलं राष्ट्रीय कर्तव्य मानून स्वत: खर्च सोसून तन- मन -धनाने देशात भाजपा बहुमताने निवडून यावी,मोदी पंतप्रधान व्हावेत आणि देश काँग्रेसमुक्त होऊन प्रगतीपथावर जाऊन महाशक्ती बनावा ,म्हणून वाराणसीमध्ये मुस्लिम समाजाचं प्रबोधन करतो आहे ."झहीर शेख सांगतात.
"हमारा खुदा परवरदिगार कुराण में फर्माता है कि 'मैने तुमको जिस धरती पर पैदा किया ,जहाँ के नदियोंका पानी पीकर तुम पले और बढ़े हो ,जहाँ की हवाओंकी सास तुम लेते हो और जहाँ के खेतोंमें पैदा हुआ अनाज खाकर तुम जिन्दा हो,उस धरती से ,उस माँ भूम भारत से और अपने वतन हिंदुस्तान से तुम गद्दारी करोगे,तो मुझे कसम है अपने जलाल की;मैं क़यामत के रोज आप लोगोंको माफ़ नहीं करूंगा।'विरोधी पार्टीयाँ,मुलायम,मायावती मुस्लीमों से कहते हैं कि मोदी प्रधानमंत्री बन जायेंगे तो भारत के अंदर एक एक गावोंमे दंगा -फ़साद होगा। मैने मुस्लिम समाज को कहा कि भाई ,अखंड हिंदुस्तान का टुकडा किसने किया?धर्म के नाम पर जमीन का बँटवारा किसने किया?तब मोदी थे क्या ? तो फिर मोदी जी से क्यों डर रहे हो?भाजपा सुशासन व विकास के नाम पर चुनाव लड़ रही है ।उनका मतलब देश में विभाजन कराना नहीं है ।नरेंद्र मोदी सबको एक करके देश को महाशक्ती बनाना चाह रहे हैं ।भाई-भाई एक हो जाएं यह चाह रहे हैं।" झहीर शेख सांगतात.त्यांच्या पत्नी कुलसुम शेख ह्यांनी सुद्धा प्रकृतीच्या कुरबुरीमुळे जामनगर मध्येच,प्रकृतीला झेपेल तितका भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी मुस्लिम समाजात प्रचाराचा खारीचा वाटा उचलला आहे.त्या दोघांच्या प्रयत्नांना यश आले आहे .आता तर जामनगर मध्ये मुस्लिम युवक सुद्धा गुजरातच्या मतदारांना नरेन्द्रभाई मोदी यांना 'वडाप्रधान' बनवा म्हणून जाहीर आवाहन करताहेत.गुजरातच्या नरेन्द्रभाई मोदी यांनी 'वडाप्रधान' व्हावं आणि दिल्लीत जावं म्हणून वयाची सत्तरी पार केलेले झहीर शेख कुठल्याही प्रलोभनाशिवाय,स्वयंप्रेरणेनं उत्तरप्रदेशात -काशीत नरेंद्र मोदी ,भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांच्या प्रचार -प्रसारार्थ मुस्लिम समाजाचं प्रबोधन करण्यात बुडून गेले आहेत .

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home